पुणे

अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस – दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी :स्वप्निल कदम

पुणे : अल्पवयीन मुलाला ओढत फरफटत नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी 16 वर्षाच्या पीडित मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर सोनावणे (वय-21 एका रा. दांडेकर पूल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शुक्रवारी (दि.19) दुपारी दोनच्या सुमारास दांडेकर पुल येथील पीएमटी बस स्टॉपवर मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने पीडित मुलाला बळजबरीने ओढत फरफटत बस स्टॉपच्या पाठिमागे असलेल्या मुतारीत नेले. त्याठिकाणी त्याच्यासोबत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. पीडित मुलाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सोनावणे याच्याविरुद्ध IPC 363, IPC 376, IPC 377, IPC 323, 506 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्यामार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. जाधव करीत आहेत.