पुणे

युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी- घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया

हवेली प्रतिनिधी : अमन शेख। घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने हडपसर येथील बिराजदार नगर येथून अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोहेल जावेद शेख (वय-२० रा. बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली येथील शुभम सिल्क हाऊस कापड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसाना माहिती मिळाली की, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसर येथे येणार आहे मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिराजदार नगर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे