शिरुर

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवैध देशी विदेशी दारू साठ्यावर छापा दोन आरोपी गजाआड

प्रतिनिधी स्वप्नील कदम

शिरूर …पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना प्राप्त झालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे शिरूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे मुजाळवाडी कवठे यमाई .ता.शिरूर जिल्हा पुणे या परिसरात इसम नामे साहेबराव भाऊ कांदळकर. वय ४९ वर्ष, रा. सदर यांचे एस .के. हॉटेल वर तसेच इसम नावे शुभम पांडुरंग मुंजाळ वय 22 वर्षे राहणार सदर यांचे किनारा हॉटेलवर स. पो. नि. संदीप कांबळे, सहा. फौज. नाजिम पठाण, पो. अ. नागलोत यांनी छापा कारवाई करून त्यांचे हॉटेल वर राहते घरात वरील इसमांनी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगलेला एकूण ९६,०८०/ रु. किमतीचा देशी-विदेशी दारू साठा जप्त करून छापा कारवाई केली आहे. सदर छाप्या मध्ये शिरूर पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे १) साहेबराव भाऊ कांदळकर,वय ४९वर्ष, मुंजाळवाडी कवठे यमाई, ता.शिरूर जिल्हा पुणे२) शुभम पांडुरंग मुंजाळ वय २२ वर्ष, रा. सदर यांचे विरुद्ध गु. र.न.९०६/२०२१ महा. प्रो. का. क ६५ ई) व गु. र. न.९०७/२०२१ महा . प्रो. का. क.६५( ई) प्रमाणे ०२ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून गुन्ह्यात वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. फौज. पठाण व पो. ना. शिंदे हे करत आहे.