पुणे

डोळ्यात मिरचीची पुड टाकून, दौड मध्ये किराणा व्यापाऱ्याची केली लूट, दौड पोलीसांनी चोरांना ठोकल्या बेड्या…

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

पुणे : दौंड शहरातील एका किराणा व्यापारी भक्तू सुखेजा हे नेहमीप्रमाणे दुकानांमधील दिवसभर मालविक्री करून जमा झालेली रक्कम १९,६४,०००/- रुपये व एक अॅक्सिस बँकेचे चेक बुक असे पांढरे रंगाचे कापडी पिशवी मध्ये घेऊन घरी जात असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या अनोळखी ५ इसमांनी त्यांचे डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांचे हातातील पिशवी हिसकावून घेऊन त्यांच्याजवळील रोख रक्कम चोरी करून नेली होती. या घटनेची माहिती फिर्यादी यांनी तात्काळ दौंड पोलीस ठाणे येथे दिली असता दौंड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी संपूर्ण दौंड शहरात कोंबिंग ऑपरेशन सुरू केले होते. पोलिसांनी घटनास्थळ पाहणी करत परिसरातील संशयित इसम यांची गोपनीय सुत्रांमार्फत चौकशी केली असता कमल उर्फ कोमल हिरमटकर व प्रदीप उर्फ गणेश महेश कोळी हे दोघे व इतर तीन अनोळखी इसम यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे पोलिसांना समजले. या माहितीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ तीन वेगवेगळे पथक तयार करून वेगाने सूत्र हलवत आरोपी शोधण्यासाठी पथक रवाना केले होते.यावेळी डी.बी पथकाचे पो.उपनि गोसावी व पो.हवा राऊत हे सिद्धार्थ नगर भागात संशयीतांचा शोध घेत असताना कमल हिरमटकर हा दुचाकी वरून पाटस रोडने जात असल्याचे त्यांना दिसल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून पाटस रोडला त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने स्वत: व आरोपी १) गणेश महेश कोळी (रा.दौंड) २) आकाश पिल्ले (रा.देहू रोड) ३) ऋषिकेश (शेऱ्या) अडगळे (रा.देहू रोड) व १ विधीसंघर्षीत बालक यांचे सोबत मिळून सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली. यानंतर दौंड पोलिसांनी वरील सर्व आरोपींना शिताफीने अटक केली.सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पो.उपनि शहाजी गोसावी, पो.उपनि महेश आबनावे व स.पो.नि तुकाराम राठोड यांचे अधिपत्याखाली वेगवेगळे पथक तयार करून उर्वरित आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने पथकांनी दौंड मधून गणेश कोळी व देहू रोड येथून उमर शेख व आकाश पिल्ले यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून त्यांनी चोरलेली ६,५२,०००/- रुपये रक्कम हस्तगत केली आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, अप्पर
पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सपोनि ऋषिकेश अधिकारी, सपोनि तुकाराम राठोड, पो.उपनि शहाजी गोसावी, पो.उपनि महेश आबनावे, स.फौ.महेंद्र गायकवाड, पो.हवा सुभाष राऊत, पो.ना अमोल गवळी, पो.ना विशाल जावळे, पोना / रणजित निकम, पो.ना. आमिर शेख, पो.ना सचिन बोर्हाडे, पो.ना.आदेश राऊत, पो.कॉ अमोल देवकाते, पो.कॉ गिरमे यांनी केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे करीत आहेत