पुणे

हडपसरवासीयांना मिळाला ‘ऑक्सिजन’ प्लांट! आमदार चेतन तुपे, खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून हडपसरला साकारला ऑक्सिजन प्लांट, सुसज्ज कोविड हॉस्पिटल

हडपसर, दि.११- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार चेतन विठ्ठल तुपे यांच्या आमदार निधीतून, खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून आज दि.११ डिसेंबर रोजी हडपसर मतदारसंघातल्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.

हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या आमदार निधीतून व आणि खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या विशेष सहकार्यातून हा ऑक्सिजन प्लांट तसेच ५८ खाटांचे सुसज्ज असे कोविड हॉस्पिटलही हडपसरवासीयांच्या सेवेत आजपासून रुजू झाले आहे. हडपसरवासीयांना ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही या मी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती होते आहे याचे समाधान वाटत असून आता हडपसरच्या जनतेला ऑक्सिजनसाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार चेतन तुपे यांनी यावेळी व्यक्त केली.

पुणे महानगरपालिका व इन्फोसिस फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा प्लांट साकारण्यात आला आहे. काही तातडीच्या कामानिमित्त आमदार चेतन तुपे व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना ऐनवेळी मुंबई येथे जावे लागल्याने प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. परंतु हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

या लोकार्पण सोहळ्यास नगरसेविका वैशाली बनकर, नगरसेविका हेमलता मगर, नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, नगरसेवक मारुतीआबा तुपे, नगरसेविका पुजा कोद्रे, निलेश मगर, युवा नेते ईशान तुपे, इन्फोसिसच्या विजयालक्ष्मी मणी मॅडम, रुपेश शहा, एक्सलेनसिया कंपनीचे वैभव बारभाई, पुणे मनपा हडपसर सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, अधिकारी श्री.तांबे, आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल काळे, डॉ.दिनेश बेंडे, मगरपट्टासिटीचे नंदकुमार मगर, संजय मगर, अरुण मगर, हॉस्पिटलचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.