पुणे

भाजपच्या 100 पेक्षा अधिक आंदोलन कर्त्यांची धरपकड, उरुळी कांचन येथे भाजपचे रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी उधळली…

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

लोणी काळभोर: शेतकऱ्यांच्या थकित वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज तोड मशीन तीव्र केले. याविरोधात हवेली तालुका भाजपाच्या वतीने रविवारी (दी.19) पुणे-सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे शांततेच्या मार्गाने रास्तारोको आंदोलन करण्यात येत होते. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी सुमारे 100 हून अधिक आंदोलनकर्त्यांची धरपकड केली आहे. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या दडपशाही विरोधात स्वतः ला अटक करण्याच्या मागणीसाठी उरळीकांचन पोलीस दूरक्षेत्रात आंदोलन सुरू केले आहे.

भाजप तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे म्हणाले , थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरण विजतोड मोहीम सुरू केली आहे. याविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांना कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी परवानगी नाकारल्यानंतर भाजपच्या वतीने शांततेच्या मार्गाने पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलनकर्त्यांची फरफट करून त्यांना रस्त्यावरून बाजूला काढून पोलिसांनी धरपकड केली. आंदोलन करतांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, पंचायत समिती सदस्य श्‍यामराव गावडे, सुदर्शन चौधरी आदींनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून स्वतःला अटकेची मागणी करून उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची धरपकड केल्याचा आरोप भोंडवे यांनी केला आहे.

… न्यायालयात धाव घेणार: खांडरे
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हणजे महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा आहे. पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असतील तर भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणखी आंदोलने करू. पोलिस हे स्थानिक लोकप्रतिनिधींचे ऐकून असे कृत्य करत असतील तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा संपर्क नेते धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले