पुणे

हडपसरमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई ; १४ जण ताब्यात, हुक्का चालविणाऱ्यांविरोधात गुन्हा

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

पुणे : हडपसरमधील काळेपडळमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशिर हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी १४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५ हजारांवर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी जयदिप रामचंद्र पवार (वय २८ रा. फुरसुंगी ) आणि अमोल पांडुरंग शेलार (वय २९ रा. ढमाळवाडी फुरसुंगी ) यांच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

काळेपडळ परिसरातील संकेत विहारमध्ये बेकायदेशिर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, प्रशांत भोसले, रियाज शेख, निखिल पवार, प्रशांत दुधाळ यांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी १४ जण हुक्का ओढत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून १५ हजारांवर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. हुक्का चालविणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रत्नदिप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आविनाश शिंदे, प्रशांत भोसले, रियाज शेख, निखिल पवार, प्रशांत दुधाळ यांनी केली.