हवेली

पुणे सासवड रोड येथे चारचाकी मधील तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

ता. हवेली प्रतिनिधी:- अमन शेख

पुणे – सासवड मार्गावरील उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत दोन मोटारसायकल आलेल्या चार जणांनी कोयत्याचा धाक दाखवून चारचाकी चालकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना शनिवारी संध्याकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी अजिंक्य अजित वाघ (वय ३० रा. श्रीकृष्ण अपार्टमेन्ट, गंगापुरी वाई, ता. वाई जि सातारा) यांनी अज्ञात चार चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितनुसार, अजिंक्य वाघ हे शनिवारी कुटुंबीय आई व भाऊ यांच्यासोबत हडपसरवरून वाई या ठिकाणी चारचाकी गाडीतून चालले होते. जात असताना उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत चारचाकी गाडीच्या पाठीमागून दोन मोटारसायकलवर चार अज्ञात तरुण आले व चारचाकी गाडी थांबविण्यास सांगितले.त्यावेळी अजिंक्य वाघ यांनी गाडी बाजूला घेतली. मोटार सायकल वरील चार अनोळखी इसम मोटार सायकल वरुन खाली उतरुन गाडी जवळ आले. गाडीच्या काचा खाली घेत असताना त्यातील दोघांनी दगड घेवून कारचे काचेवर फेकुन मारले. त्यानंतर दोन्ही इसम गाडीजवळ आले.

त्यापैकी एकाचे हातात कोयता होता. त्याने कोयत्याचा धाक दाखवुन शिवीगाळ करुन शर्टचे खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. व पाठीमागील बाजूस बसलेली वाघ यांची आई यांना शिवीगाळ करून गाडीत काय ठेवले आहे याची विचारपूस करू लागले.दरम्यान, अजिंक्य वाघ व त्यांचे भाऊ हे गाडीच्या बाहेर आले असता चौघेजण त्या ठिकाणावरून पळून गेले. सदरील चौघेजण २० ते २५ वयोगटातील आहेत. त्यांच्याविरोधात वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.