हवेली

घरफोडी करणा-या ३ सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेकडुन दिड लाख रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त

ता. हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

             याप्रकरणी शाहरुख विजय पवार (वय २७) बाज्या विजय पवार (वय २१) देवगुन विजय पवार (वय १९, सर्व रा.माप्तेमळा, ता. आटपाडी जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार यल्लाप्पा कलाप्पा सन्नके (सध्या रा. होळकरवाडी ता. हवेली. मुळ रा. सोलापूर) हे त्यांचे होळकरवाडी येथील रहाते घरास कुलुप लावुन गावी गेले होते. ६ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी 

७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयानी त्यांचे घराचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन घरातील एकुण ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले होते.

            सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक  राजेंद्र मोकाशी, यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर व पोलीस अंमलदार सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस हवालदार नितीन गायकवाड व सुनिल नागलोत यांना सदरचा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख पवार व त्याचे भावांनी केला असुन ते वडकी परीसरात आले असल्याचे बातमी मिळाली. त्याप्रमाणे मोकाशी यांचे आदेशानुसार महानोर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सुनिल नागलोत श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, दिगंबर साळुंके यांचे समवेत वडकी परीसरात सापळा रचुन शाहरुख, बाज्या व देवगुन पवार यांना शिताफीने ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन ३० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच यातील देवगुन पवार हा यापुर्वी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दोन घरफोडीच्या गुन्हयात पाहीजे आरोपी होता.

         सदरची उल्लेखनीय कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५ नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली करण्यात आली आहे.