सातारा

किसनवीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात भर दिवसा राडा झाल्याने इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

वाई प्रतिनिधी ओंकार पोतदार

वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या तालुक्यासह इतर तालुक्यातील पाच ते सहा हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत असतात पण बावधन आणि पसरणी या गावातील विद्यार्थ्यांमध्ये कुठल्यातरी कारणाने वाद होत असतात त्याचे रूपांतर एकमेकांची डोकी फोडणे मध्ये होत असते हे गेले कित्येक वर्षापासून सुरू आहे किसनवीर कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या गेटच्या परिसरात सी सी कॅमेरे नसल्याने दररोज हाणामारीचा फड भरत असतो यावर किसन वीर महाविद्यालय आणि विद्यार्थी पालकांची एकत्रित बैठक घेऊन अशा घटना वारंवार घडणार नाही अशी खबरदारी घ्यावी अशी वाई तालुक्यातील जनतेतून मागणी होत आहे. अशावेळो वेळी होणाऱ्या भांडणातून एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू होऊ शकतो याचा विचार किसनवीर महाविद्यालयाने ठोस पावले उचलावी अशी मागणी होत आहे.