हवेली

लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतून तडीपार केलेले गुन्हेगारास अटक

हवेली ता.प्रतिनिधी:-अमन शेख

पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार करण्यात आलेला रेकार्डवरील सराईत गुन्हेगार प्रणव भारत शिरसाठ व २१ वर्षी लोणी स्टेशन ता.हवेली, जि.पुणे त्यास पुणे जिल्हा हद्दीतून तडीपार केलेले असताना देखील तो लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असलेबाबत बातमी मिळाली त्याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यानी तपास पथकाचे अधिकारी सपोनि/राजु महानोर व ठाणे-अंमलदार यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या, असता नमुद पथकाने तडीपार सराईत गुन्हेगार यांस त्यास लोणी काळभोर गावचे हद्दीतून पाठलाग करून त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगीरी मा.  नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मा. नम्रता पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५. मा. बजरंग देसाई, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, राजेंद्र मोकाशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी सपोनि/राजु महानोर यांचे सोबत मोहवा/नितीन गायकवाड, पोना/सुनिल नागलोत संभाजी देविकर यांचे पथकाने केली आहे.