पुणे

लोणी काळभोर पोलिसांनी तीन महीने गुंगारा देणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

प्रतिनीधी:स्वप्नील कदम

लोणी काळभोर :स्टीलची चोरी करण्याचा प्रयत्न करताना चोरीचा प्रयत्न अडविताना सुरक्षारक्षकाला लोखंडी रॉडने व लोखंडी कोयत्याने मारहाण करुन पोलिसांना साडेतीन महिने गुंगारा देणाऱ्या दोघा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

संकेत सुनील गायकवाड (वय २१ वर्षे, राज रवींद्र पवार व सुमित साळवे (दोघेही रा. कवडीपाट टोलनाका, गुजरवस्ती ता हवेली जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी महेश सुभाष सावंत (वय २८ वर्ष, रा.अंबिका मंदिरामागे, कवडीपाट टोलनाका, ता. हवेली, जि पुणे) असे तक्रार दिलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोंव्हेबर २०२१ रोजी रात्री साधारण ८ च्या सुमारास आरोपी संकेत सुनील गायकवाड व त्याचे पवार, साळवे हे दोन साथीदार ग्रीन सिटी ,फुरसूंगी या ठिकाणी चोरी करण्यास गेले असता तेथील सुरक्षारक्षक महेश सुभाष सावंत यांनी त्यांना रोखण्याचा प्रयन्त केला ,मात्र गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी सावंत यांच्यावर लोखंडी रॉडने व लोखंडी कोयत्याने मारहाण केली. त्यानंतर हे आरोपी तेथून फरार झाले तो आजतागायत हे आरोपी पोलिसाना गुंगारा देत होते. दरम्यान, आज संकेत गायकवाड हा आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसानी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलिस स्टेशन राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, पोलीस हवालदार सातपुते, पोलीस नाईक धनवटे यांनी पार पाडली.