हवेली

हडपसर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी पेट्रोलिंग करत करत असताना सराईत गुन्हेगारा कडून २ गावठी पिस्टल व २७ जिवंत काडतुसे केली जप्त

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील तपास पथक अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करत असतना पोलीस अमलदार समीर पांडुळे, प्रशांत टोणपे आणि रियाज शेख यांना एक बातमीदार कडून बातमी मिळाली की एक इसम रिक्षा मधून फुरसुंगी रेल्वे ब्रिजजवळ पिस्टल विक्रीसाठी येणार आहे अशी बातमी मिळाल.

मिळालेल्या बातमीप्रमाणे सदरची माहीती मा. अरविंद गोकुळे पोलीस निरीक्षक हडपसर पो.स्टे यांना
सांगून त्यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी श्री विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे रियाज शेख सुरज कुंभार यांनी सदर भागात सापळा रचून मोठ्या शिताफीने पाठलाग करून संशयीत रिक्षा चालक यास ताब्यात घेतले.

त्याला त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सुरज व्यंकट पोतदार वय ३२ वर्ष रा. त्रिवेणी कॉलनी, संस्कार हॉलजवळ, फुरसुंगी पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कडून १ गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे मिळून आले.व जप्त करून त्यास पोलीस स्टेशन येथे नेहुन अधिक तपास करीत असताना, नमुद आरोपीविरूध्द २०१३ ते २०२१ दरम्यान पुणे शहरात खंडणी, अपहरण, बेकायदेशिर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली,

त्यामुळे त्याचेकडे अधिक सखोल तपास केला असता त्याने त्याच्या घरात आणखी १ गावठी पिस्टल व २२ जिवंत काडतुसे असल्याचे सांगितले व त्याच्या घरामध्य जाऊन झडती घेतली असता मुद्देमाल मिळून आला अरोपीकडून २ गावठी पिस्टल व २७ जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला.
असून त्याच्यावर हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
व त्याला न्यायालयात हजार केले असता त्याला ०५ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास
हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.