पुणे

एमआयटी एडीटी विद्यापीठाचा विध्यार्थी आदित्य गंगाधर याच्या सायबर-गुन्हेगारीच्या जागृतीवरील लघुपटाला ५० हजाराचे बक्षीस

पुणे प्रतिनिधी -अमन शेख

   एमआयटी आर्ट , डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी इन्टिट्यूट ऑफ डिझाईनचा विध्यार्थी आदित्य गंगाधर याला सोसायटी फॉर सायबर सिक्युरिटी कौन्सिल (SCSC) हैदराबाद आणि सायबराबाद पोलिस यांच्यातर्फे आयोजित सायबर-गुन्हेगारीवरील लघुपट स्पर्धेत सायबर-गुन्हेगारी जागृतीवर लघुपटाला ५० हजाराचे पहिले बक्षीस जिंकले.
सोसायटी फॉर सायबर सिक्युरिटी कौन्सिल (SCSC) हैदराबाद आणि सायबराबाद पोलिस यांच्यातर्फे एमआयटी इन्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विध्यार्थ्यांना सायबर-गुन्हेगारी जागृतीवर २ मिनिटांचा लघुपट बनवण्यास सांगितले होते. त्यात विध्यार्त्यानी भाग घेत सायबर गेम हा लघुपट बनवला होता. या स्पर्धेत हा लघुपट विजेता ठरला. यासाठी प्रो. निमिष गौर आणि प्रा. आकाश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
     हैदराबादचे पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांच्या हस्ते त्यांना 50 हजारांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड,प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी आयडीचे डीन डॉ. नचिकेत ठाकूर यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.