पुणे

एमआयएमच्या उमेदवारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या भाजपनेच युती केली – नगरसेवक नाना भानगिरे यांचा आरोप

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन प्रतिनिधी)
शिवसेनेने कधीच हिंदुत्व सोडलेली नाही एमआयएम सोबत महाविकासआघाडीने देखील आघाडी केलेली नाही मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली यामध्ये एमआयएमचे देखील नगरसेवक निवडून आले आणि पुण्यात भारतीय जनता पार्टीने एमआयएम सोबत युती केली अन महाविकास आघाडी ला बदनाम करण्याचे षड्यंत्र केले जात आहे, असा आरोप शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी केला आहे.
एमआयएम पक्षाचे खासदार इम्त्याज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीबाबत प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे,
एमआयएम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही मात्र भारतीय जनता पार्टी अफवा पसरविण्याचे काम खूप प्रामाणिकपणे करत आहे, महाराष्ट्रात व पुण्यात एमआयएम सोबतच्या आघाडी प्रस्ताव बद्दल शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला असताना विनाकारण भाजप बदनामी करण्याचे काम करत आहे असे सांगून शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे पुढे म्हणाले शिवसेना पक्ष आज कट्टर हिंदुत्ववादी आहे व उद्याही राहील याबद्दल प्रश्नच नाही मात्र जम्मू-काश्मीरमध्ये कोणी कोणाशी युती केली हे आता आम्ही भारतीय जनता पार्टी ला सांगायचे का हादेखील विचार भाजपने केला पाहिजे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला भारतीय जनता पार्टीने महापालिकेत एमआयएमचा पाठिंबा का घेतला हे गिरीश बापट व चंद्रकांत पाटील यांनी जाहीरपणे सांगावे इतर पक्षाचे लोक निवडून येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीचे लोक मुस्लीम वर्ग ज्या भागात जास्त राहतो त्या भागात या एमआयएम च्या उमेदवारांना आर्थिक पाठबळ देते हे आता जग जाहीर करू का? असा सज्जड दमही यावेळी शिवसेना नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी दिला आहे.