हडपसर

संत नामदेव महाराजांच्या विचारावर वारकरी संप्रदायाचा डोलारा उभा

संत साहित्याचे अभ्यासक दशरथ यादव यांचे प्रतिपादन

हडपसर: वारकरी संप्रदायाचा डोलारा संत नामदेव महाराज यांच्या विचारांवर उभा राहिला असून त्यांनी उभी हयात भारतभर पदभ्रमण करून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक आणि वारीच्या वाटेवर या महा कादंबरीचे लेखक दशरथ यादव यांनी केले.

संत नामदेव सेवा संघ हडपसर यांचे वतीने चैत्री गौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संत नामदेव महाराज जीवन चरित्र या विषयावर ते बोलत होते.
श्री यादव म्हणाले, वारकरी संप्रदायाचा विचार माणसांच्या मनात खोलवर रुजविण्याचा प्रयत्न संत नामदेवांच्या कीर्तनातून झाला. संत जनाबाई म्हणतात संत नामदेवांचे कीर्तन इतके प्रभाव शाली होते की, नामदेव कीर्तन करी प्रेमाने नाचे पांडुरंग. पंढरपूरचा विठोबा कीर्तनात दंग होऊन जात असे. अंध श्रद्धा रुढी मोडून समतेचा भगवा नामदेव महाराजांनी अडचणीच्या काळात फडकवित ठेवला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी भागवत धर्म जनमानसात रुजविला. नामदेवांच्या साहित्याचा अजून अभ्यास होणे गरजेचे आहे. वारकरी चळवळीच्या शुद्धीकरणाची गरज आहे. निकोप समाज व्यवस्था टिकविण्यासाठी नामदेव महाराजांनी खूप कष्ट सोसले.
यावेळी महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साड्यांचे वाटप आमदार चेतन तुपे पाटील यांच्या पत्नी सोनलताई तुपे, नगर सेविका उज्वला जंगले, नगरसेवक योगेश बापू ससाणे, माजी महापौर वैशालीताई बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील बनकर व संत साहित्याचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भारद्वाज यांच्या मार्गद्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत नामदेव सेवा संघाचे अध्यक्ष
राजेंद्र पोरे,सुधीर भाऊ हेंद्रे, सुभाष भारद्वाज,दिगंबर दानवे ,जयश्री मुळे ,प्रकाश क्षीरसागर,गजानन सदरे ,मिलींद पाडळकर ,सुदाम सुपेकर , पुरूषोत्तम नेवासकर,हनुमान वाव्हळ, प्रमोद बसाळे,संदिप कालेकर , राजेंद्र काळे,रवींद्र नेवासकर,जयश्री नेवासकर ,अलका कडदेकर,उज्वला कालेकर, ममता पाडळकर,संगीता काकडे भारती नेवास्कर उपस्थित होते.