पुणे

मारूती सुझुकी इको गाड्यांचे सायलेन्सर चोरांकडून पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील आणखीन ९ सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघड

प्रतिनिधी – स्वप्नील कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दि. उन १४/४/२०२२ रोजी मारूती सुझुकी इको या चारचाकी गाड्यांचे सायलेन्सर चोरनारे आरोपी नामे १) शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे वय २१ वर्ष रा. गोपाळपूरा , आळंदी ता. खेड जि.पुणे
२) राम राजेश ढोले वय २० रा. आळंदी ता.खेड जि. पुणे यांना शिताफीने अटक करून त्यांचा कडून कि.रू.३,६०,४००/- रू चा मुद्दे माल जप्त करुन लोणी काळभोर पोलीस स्टेशन अभिलेखावरील ०५ सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले होते.
नमुद आरोपीकडे १० दिवसांच्या मंजुर पोलीस कस्टडी मुदतीत अधिक सखोल तपास करता आरोपी यांनी पुणे शहर व पुणे जिल्हा हद्दीत आणखीन सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपी कडे सखोल तपास करून आणखी गुन्हे उघडकिस आणले आहेत.
१) विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.न.५४८/२०२१ भा. द. वी.क.३७९
२) येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. न.५४८/२०२१ भा. द.वी. क.३७९
३) सासवड पोलीस स्टेशन गु. रजि. न.२५/२०२२ भा. द. वी. क.३७९( पुणे ग्रामीण)
४) सासवड पोलीस स्टेशन गु.र. न.३०६/२०२१ भा. द .वी. क.
३७९( पुणे ग्रामीण )
५) सासवड पोलीस स्टेशन गु.र. न.२३/२०२२ भा. द. वी. क.३७९ (पुणे ग्रामीण )
६) हडपसर पोलीस स्टेशन गु. र. न.२४८/२०२२ भा. द. वी. क ३७९
७) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.न.२३६/२०२२ भा. द. वी. क.३७९
८)कोंढवा पोलीस स्टेशन गु. र. न.२६२/२०२२ भा. द वी. क.३७९
९) कोंढवा पोलीस स्टेशन गु. र. न.२४८/२०२२ भा.द.वी. क.३७९
वरीलप्रमाणे ०९ व यापूर्वी ०५ असे एकूण १४ गुन्ह्यांची उकल आरोपी यांचेकडून करण्यात आली आहे. आरोपी यांच्या कडे केलेल्या तपासामध्ये मारूती सुझुकी इको गाडी चे सायलेन्सर मधील कॅथलिक कन्वर्टर मध्ये असलेले धातु हा मोल्यावन असल्याने आरोपी अशा प्रकारे चोरी करून त्या मधील मूल्यवान धातु चा चुरा काढून तो आरोपी नामे शहबाज खान पूर्ण नाव पत्ता माहित नाही यास विक्री करीत असल्याची निष्पन्न झाले असुन शहाबाज खान याचा शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी  अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -५,  बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग राजेद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे) लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचा मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी स. पो. नि./ राजु महानोर, यांच्या पोहवा/ नितिन गायकवाड, संतोष होले,पोना/ सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, सागर वणवे पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे ,बाजीराव वीर शैलेश कुदळे, दिगंबर साळुंखे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.