पुणे

अन हडपसर च्या सामाजिक कार्यकर्त्याने सापडलेले पैशाचे बंडल केले परत… आमदार चेतन तुपे यांनी केले कौतुक…

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
मगरपट्टा चौकात अनवधानाने पडलेले 68 हजात सातशे वीस रुपयांचा बंडल रामभाऊ कसबे यांना सापडले, ज्या व्यक्तीचे पैसे पडले होते त्याची खात्री करून पैसे परत केले आणि आमदार चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
हे पैसे सचिन नाईकवडे यांचे होते. खात्री केल्यानंतर आमदारांच्या हस्ते परत करण्यात आले.
यावेळी आमदार चेतन तुपे यांच्यासह रामभाऊ कसबे, शिवाजी खलसे, अशोक फासगे, संतोष पवार, राजू दिवटे, पप्पू मगर, घुमरे महाराज, ढगे महाराज, कदम महाराज शिंदे आदी उपस्थित होते.

माणसाचा प्रामाणिकपणा हीच मोठी संपत्ती
रस्त्यावर अनेकांचे कागदपत्र, पैसे, सोने हरवत असतात, काही लोक ते परत देत नाहीत पण ज्यांच्या वस्तू हरवतात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो, आज पैशाचे बंडल सापडले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तातडीने ते परत केले, ज्यांचे पैसे होते त्यांना मिळाल्याने जे समाधान मिळाले त्याची तुलना करता येत नाही, माणसाचा प्रामाणिक पणा हीच खरी संपत्ती आहे.
चेतन तुपे पाटील
आमदार – हडपसर विधानसभा