हवेली

युनिट ६ गुन्हे शाखा ने अट्टल वाहनचोराला जेरबंद करून सहा लाख रुपये किंमतीची एकूण १३ वाहने केली जप्त

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

अट्टल वाहनचोराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडून सहा लाख रुपये किंमतीची एकूण १३ वाहने जप्त केली आहे. मोन्या उर्फ विनोद आनंद कांबळे (वय ३० रा. हिराबाई झोपडपट्टी, लांडगे चाळ, शंकर मंदिरामागे, कासारवाडी, पिंपळे गुरव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अट्टल वाहनचोर मो उर्फ विनोद आनंद कांबळे हा खुळेवाडी, विमाननग पुणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पुणे नगर हायवेकडून खुळेवाडी कडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून आरोपीला पकडून त्याच्याकडील मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटार सायकलबाबत पोलिसांनी त्याच्याकडे तपास करता त्याने ती मोटार सायकल ही आरोपीने हडपसर येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यास नमूद गुन्हयामध्ये अटक करून न्यायालयात हजर करून त्यांची दिनांक ०१ जुन पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आली आहे.
पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे तपास करता त्याने पुणे शहर, मुंबई, सांगली, अहमदनगर, नागपूर येथून मोटार सायकली त्याच्या एका साथीदारासह चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून एकूण सहा लाख रूपये किंमतीच्या एकूण १३ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे. त्याच्याकडून खालील नमूद पोलीस स्टेशन कडील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेस यश आलेले आहे. सदरची उल्लेखनिय कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे अतिरिक्त कार्यभार, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा भाग्यश्री नवटके, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पो. उप निरी. भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.