महाराष्ट्र

श्री. गुरुदेव दत्त उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के

कवठे येमाई (प्रतिनीधी धनंजय साळवे) – श्री. गुरुदेव दत्त उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखा सविंदणे इयत्ता बारावीचा सन 2022 चा आठव्या बॅचचा निकाल 100 टक्के लागला.यंदा प्रथम क्रमांक गोसावी तृषा दीपक- 86.50%, द्वितीय क्रमांक शितोळे प्रतीक्षा बबन-85.50%, तृतिय क्रमांक घोडे सीमा विकास व बच्चे साक्षी कैलास 84.50 यांनी मिळवला व ईतर विद्यार्थ्यांनीही विशेष नैपुण्य दाखविले .मुलींनी सर्वच आघाड्यांवर मुलांपेक्षा जादा नैपुण्य दाखवुन आपण कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे दाखवुन दिले मुली आता प्रत्येक परीक्षेत मुलापेक्षा चांगली कामगीरी करताना दिसत आहेत.तसेच सविंदणे शाळेने चांगल्या निकालाची परंपरा ठेऊन शाळेचे नाव उंचावले आहे यात विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व कर्मचारी यांचाही मोठा वाटा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कवठे व सविंदणे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.