पुणे

पाच महिन्यापासून फरारी असलेले, खुणाच्या प्रयत्नातील आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनीधी – स्वप्नील कदम

लोणी काळभोर – लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत दि.२१/०१/२०२२ रोजी संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास माळी मळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर येथे फिर्यादी नामे श्रीनिवास नानासाहेब जगताप वय- ३० -वर्ष, रा. सदर यांना आरोपी नामे अमित सोनवणे, अभिषेक पवार यांचे सह १० ते १२ जणांचे टोळक्याने मोटार सायक ली वरती येऊन हातामध्ये लोखंडी कोयते फिरवुन दहशत निर्माण करुन फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले. म्हणुन भादवी कलम ३०७,३२४,५०६(२), १४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म ॲक्ट ४(२५) सह लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७(१) प्रमाणे गून्हा दाखल आहे.
मा.श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर,  संदिप कर्णिक पोलीस सह आयुक्त , पुणे शहर यांनी दि.११/६/२०२२ रोजी ते १२/६/२०२२ रोजीच्या दरम्यान पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्या बाबत आदेशित करण्यात आले होते.त्याकरिता मा. राजेन्द्र मोकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपास पथकातील सपोनी/ महानोर व पोलीस अंमलदार यांना कारवाईचे आदेश दिले. सदर फरारी आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार राजेश दराडे व बाजीराव वीर यांना त्याच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, खुनाचे प्रयत्न केलेल्या गुन्ह्यातील ५ महिन्या पासून फरारी असलेल्या आरोपी नामे अमित सोनवणे हा थेऊर येथे म्हातार आई मंदिरात प्रेम विवाह करण्याकरिता त्याच्या साथीदारा सह येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने सदर बाबत सपोनी/ महानोर यांना माहिती दिली.असता त्यांनी लगोलग मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवले असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करणे कामे आदेशित केल्याने पोलीस अंमलदार नितिन गायकवाड, संतोष होले, राजेश दराडे, बाजीराव वीर, व इतर स्टाफ असे सदर ठिकाणी जाऊन मिळाले बातमी प्रमाणे वेषांतर करून सापळा लावून खात्री केली असता तेथे बातमी प्रमाने लग्न पोशाखात काहीजण चारचाकी वाहणातून म्हातार आई चे मंदिराच्या आवारात आले व मंदिरातील पुजाऱ्याकडे जात असताना आमची खात्री झाल्याने आम्ही सदर इसमास पकडण्यासाठी गेलो . असता त्यास आमची चाहूल लागल्याने लग्न पोशाखातील इसम व त्यांचा साथीदार तेथून पळून जाऊ लागले असता आम्ही त्याचा पाठलाग करुन त्यास थोड्याच अंतरावर पकडले. पकडलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव १) अमित बालाजी सोनवणे, वय- २३ वर्ष, रा. पाण्याचे टाकीजवळ, माळी मळा, लोणी काळभोर हवेली पुणे,२) अभिषेक संजय पवार वय- २२ वर्ष, रा.माळी मळा लोणी काळभोर , हवेली पुणे, असे असल्याचे सांगुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोरे करीत आहे.