पुणे

गुन्हे शाखा पथक क्रमांक १ ने केला २० किलो गांज्या जप्त एकूण ४ लाख ३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

हवेली तालुक्यातील कदम-वाकवस्ती : -अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने २० किलो १८० ग्रॅम गांजा पकडला आहे. एका दुचाकीसह गांजा असा एकूण ४ लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

           
याप्रकरणी कुमार अनिल नितळे (वय ३०, रा.कदम-वाकवस्ती गायकवाड नगर घर नंबर ३४ ता हवेली) व ॠषीकेश रमेश बेले (वय २४ वर्षे, रा. इंदिरानगर,  नळदुर्ग, ता. तुळजापुर, जि  उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (२५ जुन) रोजी पोलीस हवालदार पांडूरंग पवार, संदीप जाधव, मोहन साळुंखे, मारूती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, मोहिते हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत रोजी रात्री ८.१५ वाजण्याचे सुमारास पुणे- सोलापुर रोडवरील लोणी काळभोर कडुन सोलापुरकडे जाणारे रोडवर कदमवाक वस्ती एच पी पेट्रोलपंपासमोरील रोडवर आले त्यावेळी तेथे करिझ्मा दुचाकी क्रमांक एमएच १२ एचवाय ८३६५ वर बसून वरील दोघेजण कोणाचातरी वाट पहात होते. गाडीवर एक नायलॉन पोते होते.

पोलीस पथकाची चाहूल लागताच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हलचाली संशयास्पद वाटल्याने दोघांना पाठलाग करून पकडण्यात आले. गाडीवरील पांढ-या रंगाचे नायलॉन पोते होते. काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी हाताने दाबुन पाहिले असता, त्यामध्ये ओलसर झाडपाल्यासारखा कोणतातरी पदार्थ असल्याचे जाणवले त्यानंतर त्यांनी पोत्याचा वास घेवून पाहता, तो वास गांजासारखा उग्र स्वरुपाचा आला. त्यामुळे त्या पांढऱ्या पोत्यांमध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने गायकवाड यांनी दोघांना  पोत्यामध्ये काय आहे असे विचारले असता त्याने तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले. 

 त्यानंतर ४ लाख ३ हजार ६०० रुपये किमतीच्या २० किलो १८० ग्रॅम गांजा सह ६० रुपये किमतीची दुचाकी १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण ४ लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांवरही एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे हे करत आहेत.