पुणे

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती शासकीय कार्यालयात साजरी न करणारे वर कठोर कारवाई करा – बहुजन दलित महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी – प्रतिनीधी स्वप्नील कदम

लोणी काळभोर- (थेऊर )साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी. ज्या कार्यालयामध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या कार्यालय प्रमुखांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बहुजन दलित महासंघ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत संघटणेचे प्रमुख आनंद वैराट यांनी आमच्या प्रतिनीधींशी बोलताना सांगितले महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग ,शासन परिपत्रक क्रमांक जपुती २२२१/प्र.क्र.११२/कार्या.२९दिनांक ३१/१२/२०२१रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती मंत्रालयात व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करणे बंधनकारक आहे. असे असताना देखील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती साजरी केली जात नाही.असे आमच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे या निवेदनाद्वारे मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे व दिनांक १ ऑगस्ट रोजी संघटनेचे कार्यकर्ते पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये जाऊन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली गेली आहे का याबाबतची माहिती घेणार आहेत. व ज्या कार्यालयामध्ये जयंती साजरी होणार नाही. त्या कार्यालयावर तिव्र आंदोलन करणार आहे.
पुणे जिल्हाधिकारी यांचे वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी पुणे मा. हिम्मत खराडे यांनी निवेदन स्वीकारले व या निवेदनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालयांना आदेश देण्यात येतील. व ज्या शासकीय कार्यालयामध्ये जयंती साजरी होणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले .या प्रसंगी बाळासाहेब मोहिते ,प्रा.सुहास नाईक, किरण माने उपस्थित होते