औरंगाबाद

पिशोर येथे पत्रकारांचा सत्कार आम आदमी पक्षाचा पुढाकार

पिशोर (प्रतिनिधी) : समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या परंतु सत्कार व मानसन्मान यापासून कायम दूर असणाऱ्या पत्रकारांचा सत्कार पिशोर येथे पार पडला. कन्नड तालुका आम आदमी पक्षाने यासाठी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी हर घर तिरंगा मोहिमेसाठी घाटमाथ्यावरील सर्व पत्रकारांना राष्ट्रध्वज आणि सोबत शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पक्षातर्फे सामान्य माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, शुद्ध पाणी, वीज, आरोग्य याबाबतीतील मूलभूत समस्या यांना वाचा फोडणार असून शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम आदमी पक्षाचाच प्रचंड धाक असल्याचे  निकम म्हणाले.

यावेळी नामवंत कवयित्री प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे, जेष्ठ पत्रकार राजानंद सुरडकर, घाटमाथा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश जाधव, सचिव बापूराव रामकर, उपाध्यक्ष अरमान मदार, ज्ञानेश्वर दवंगे, बापूसाहेब हरणकाळ,मिलिंदकुमार लांडगे किशोर जाधव, विजय थोरात, देविदास थोरात, पोपट भुसारे, भागीनाथ मोकासे, राजेंद्र गिरी, दिनेश खरात, योगेश शेळके,ज्ञानेश्वर गायकवाड, सचिन खडके, आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष दादासाहेब राठोड, शहर अध्यक्ष रईस शेख, शिक्षण संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा राठोड, उपाध्यक्ष दत्तू सोनवणे, अमोल लोखंडे, सागर पवार, दादाराव निकम, सुनील निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील, सूत्रसंचालन सतीश काळे यांनी पार पाडले तर आभार अंकुश मोकासे यांनी मानले.

रोखठोक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड औरंगाबाद