पुणे

स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी युवकांनी कार्य करावे – आमदार चेतन दादा तुपे – उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा.

हडपसर (वार्ताहार.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी रक्त सांडले.आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यामुळे आज भारत देशात स्वातंत्र्याची भव्य इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले देश सुराज्याकडे वाटचाल करत आहे. देशाचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी युवकांनी कार्य करावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चेतन दादा तुपे यांनी केले.साधना विद्यालयात आयोजित देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण करण्यात आले. एन.सी.सी.,आर. एस.पी.व स्काऊट ,रायफल ट्रुपच्या वतीने ध्वजास मानवंदना देऊन संचलन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे आजीव सभासद व साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अरविंद तुपे, थोर देणगीदार अशोक तुपे,एस.एम.जोशी कॉलेजचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत खिलारे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर, रोहिणी सुशीर,पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर,शिवाजी मोहिते , बालवाडी विभागप्रमुख जयश्री यादव
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.तर ध्वजसंचलन एन. सी. सी. ऑफिसर ,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद लालासाहेब खलाटे व R.S.P जिल्हा समादेशक रमेश महाडीक यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले.