पुणे

हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने अनोखे रक्षाबंधन साजरे

दिव्यशक्तीला सलाम करत काल दि. १२ ऑगस्ट रोजी डॉ हिमांशू पेंडसे सर यांचे संकल्पनेतून साकारलेल्या आणि हडपसर मेडिकल असोसिएशनच्या (HMA ) चे अध्यक्ष डॉ. सचिन आबणे यांच्या नेतृत्वात हडपसर कर्णबधिर विद्यालय येथील विद्यार्थीनीं समवेत रक्षाबंधन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या वेळी संघटने तर्फे अशा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन चे आयोजन करण्यामागचा उद्देश अध्यक्ष डॉ. सचिन आबणे सांगत असताना कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सांकेतिक भाषेत अनुवाद करत तेथील शिक्षिका त्या मुलांना समजावून सांगत होत्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि समाधान हे अवर्णनीय होते.
त्यानंतर डॉ. अजय माने सर यांनी सविस्तर प्रास्ताविक केले.
त्यानंतर तेथील बहिणींनी उपस्थित एच. एम. ए. सभासद भावांना राखी बांधून साखरेने त्यांचे तोंड गोड केले.
या प्रेमाच्या धाग्यात गुंफून घेत हडपसर मेडिकल असोसिएशन (HMA )ने त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनात जो विश्वास निर्माण केला त्याला तोड नाही. आजच्या दिवशी ओवाळणी म्हणुन अल्पशी आर्थिक हातभार म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांनी स्व हस्ते बनवलेल्या आकर्षक कलाकृती सर्व उपस्थितांनी खरेदी केल्या.
यावेळी मुलांनी केलेली विविध रंगी फुले, आकर्षक रांगोळी, अमृत महोत्सवी भारत या विषयावर केलेल्या कलाकृती लक्षवेधी ठरल्या. यावेळी मुख्याध्यापिका मुग्धा जगताप व त्यांच्या शिक्षक व कर्मचारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल एच एम ए तर्फे शाळेला आभार पत्र देण्यात आले.
हे सर्व पाहून एकच भावना सर्वांचे मनात आली-
दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथे कर माझे जुळती.
सदर कार्यक्रमावेळी खालील एच. एम. ए सभासद उपस्थित होते आणि त्यांनी तेथील वस्तू विकत घेऊन कर्णबधिर शाळेतील आपल्या बहिणींना एक अनोखी ओवाळणी दिली.
याप्रसंगी
हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित शिबिर यशस्वी होण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सचिन आबणे, डॉ.अजय माने, डॉ. दुर्वास कुरकुटे, डॉ.सत्यवान आटपाडकर, डॉ. राज कोद्रे, डॉ. सुशांत शिंदे,  डॉ. माधव धर्मे, डॉ. चेतन मस्के डॉ.वंदना आबणे,  डॉ. रसिका शिवरकर, डॉ. काशीद सचिन, डॉ. निधी जैन, डॉ.सचिन जाधव, डॉ. रोहित गांधी, डॉ. जयदीप फरांदे, डॉ. अक्षय राऊत, डॉ.ओमकार हरिदास, डॉ.पल्लवी लडकत, डॉ.केदार केळकर, डॉ.  नितीन सपाट, डॉ. हिमांशू पेंडसे, डॉ. विजय पवार,  डॉ.शंतनू जगदाळे, डॉ. किरण झगडे, डॉ.सागर शिंद, डॉ. स्वप्नील लडकत, डॉ.राहुल ससाणे,  डॉ.प्रविशाल आदलिंग, डॉ. फुलचंद पुजारी, डॉ. अनिकेत कांगोकर, डॉ. प्रतिक राऊत, डॉ.गौरी शिंदे, डॉ.संतोष शिंदे, डॉ.नितीन शिंदे, डॉ.मालोजीराजे तनपुरे,  डॉ. रसिक गांधी, डॉ.आनंद भन्साळी, डॉ.संदेश पाटील, डॉ. स्मिता झांजुरणे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ.मनोज कुंभार, डॉ. तानाजी हंबीर, डॉ.निरंजन रेवडेकर, डॉ. धर्मेंद्र केंद्रे, डॉ.अमोल शिंदे, डॉ. प्रीती शिंदे, डॉ. स्नेहल काळे यांनी मोलाचे योगदान दिले.