पुणे

साधना विद्यालयात समूह राष्ट्रगीत गायन

हडपसर (वार्ताहार)

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यातही स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवांतर्गत दि.9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वराज्य महोत्सवांतर्गत दि. 17 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ठीक 11.00 वाजता समूह राष्ट्रगीत गायन या उपक्रमाचे आयोजन करण्याचे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे निर्देश आहेत.
शासन निर्देशानुसार रयत शिक्षण संस्था व हडपसर वाहतूक विभागाच्या वतीने “समूह राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी, व कर्मचारी,सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे आजीव सभासद व साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते, हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक महादेव देसाई, एन.सी. सी.ऑफिसर लालासाहेब खलाटे, क्रीडाशिक्षक अशोक कोलते, कोंडिबा टेंगले सचिन धोदाड, सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.