पुणेहवेली

हवेली तालुक्यातील प्लॉटिंग व्यवसाहिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

हवेली प्रतिनिधी:अमन शेख

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील मातोश्री डेव्हलपर्सचे मालक व युवा उद्योजक प्रतिक बाळासाहेब काळंगे (वय २८, रा. उरुळी कांचन, सध्या रा . शेवाळेवाडी ता. हवेली) यांनी त्यांच्या शेवाळवाडी येथील एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दि. २४/८/२०२२ रोजी सकाळी उघडकीस आला आहे. प्रतिक काळंगे यांना दोन मुले आहेत. एक मुलगा चार वर्षाचा तर एक मुलगा तीन महिण्याचा आहे. प्रतिक काळंगे यांचे मुळगाव उरुळी कांचन असले तरी, ते पत्नीसह मागिल काही दिवसापासुन शेवाळेवाडी येथे राहत होते. प्रतिक काळंगे यांचा वाघोली, उरुळी कांचन, लोणी काळभोर सह हवेली तालुक्यात मातोश्री डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिंग व्यवसाय होता. मात्र मागिल काही महिण्यापासुनकेवळ हवेली तालुक्यातच अकरा गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या खरेदी- त्यांच्या विक्रीवर शासनाने निर्बंध लावले होते. यामुळे प्रतिक काळंगे यांच्यावर आर्थिक ताण आल्याने प्रतिक काळंगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. प्रतिक काळंगे यांचा मागिल सात ते आठ वर्षापासुन मातोश्री डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिंग व्यवसाय चालु होता. त्यांचा उरुळी कांचन, लोणी काळभोर, वाघोली, कुंजीरवाडीसह पूर्व हवेलीमधील अनेक गावात प्लॉटिंग व्यवसाय चालु होता. मात्र मागिल वर्षभरापासून हवेली तालुक्यातच अकरा गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर शासनाने निर्बंध लादल्याने त्यांच्या व्यवसाय बंद पडला होता. यामुळे ते आर्थिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. याच नैराश्यातुनआत्महत्या केली असावा असा अंदाज त्यांच्या मित्र मंडळी व जवळच्या नातेवाईकांकडुन समजला जात आहे. प्रतिक काळंगे यांच्या घरातील नातेवाईकांनी मात्र त्यांच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट सांगितलेले नाही. हवेली तालुक्यात तुकडा बंदी कायदा कधी हटवणार ? हवेली तालुक्यातील ११ गुंठे खरेदीखत बंद असल्याने अनेक डेव्हलपर्स व्यवसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. राज्य सरकार ने जे नियम घालून इतर तालुक्यामध्ये खरेदीखत चालू आहेत फक्त हवेली तालुक्यामध्येच का बंदी यासाठी भारतीय जनता पार्टी चे हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दि. २५ ऑगस्ट २०२२ पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असून लवकरात लवकर राज्य सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी असे संदीप भोंडवे यांनी बोलताना सांगितले.