पुणेहडपसर

पुणे महिला काँगेस शहर उपाध्यक्षपदी सौ. पल्लवी प्रशांत सुरसे यांची निवड

स्वाभिमानी महिला संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सौ पल्लवी प्रशांत सुरसे यांची पुणे शहर महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसे नियुक्तीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा नानाभाऊ पटोले, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते देण्यात आले
यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,शहराध्यक्ष अरविंद शिंदे ,पुणे शहर महिला अध्यक्ष सौ पूजा आनंद प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. पल्लवी सुरसे यांचे कोरोनाच्या काळातील काम अविस्मरणीय आहे. विविध स्तरातील महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून अथवा स्वाभिमानी महिला संस्थेच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम हे उल्लेखनीय आहेत ते निश्चितच पुढील काळात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रेरणादायी काम करतील अशी भावना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केली.
काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एन एस यु आय पासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या पल्लवी सुरसे या भविष्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी निश्चितपणाने काम करतील अशी अपेक्षा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.

पल्लवी सुरसे यांनी यापूर्वी महिला काँगेस शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं असून त्या स्वाभिमानी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत तर विविध संस्थेवरती ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे पती प्रशांत सुरसे हे पुणे शहर काँग्रेस ओबीसी चे शहराध्यक्ष आहेत
त्यांच्या नियुक्तीचे पत्र महिला अध्यक्षा सौ पूजा ताई आनंद यांनी दिले.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व महिला काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.