पुणे

अनुथम हौसिंग सोसायटीच्या गणेशोत्सवाची शानदार पध्दतीने सांगता

अनुथम हौसिंग सोसायटीच्या गणेशोत्सवाची शानदार पध्दतीने सांगता झाली.
दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांनी, महिलांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन बक्षिसे मिळवली.
अनुथमचे बांधकाम व्यावसायिक मुकेश भाई यांच्या हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
रोजच्या आरतीसाठी माजी नगरसेवक आनंद आलकुंटे, योगेश ससाने, मारुती आबा तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण माजी महापौर निलेश मगर यांच्या हस्ते संपन्न झाला.
नियोजन श्री.वसौ.अभिजित जोशी, अंतद, देशपांडे, सौ.नाईक, कोलते सर, सात्यकी मेथेकर, सुजीत माने, संतोष तुपे आदींनी केले.
विसर्जन मिरवणुकीत श्रीगणेशाची मुर्ती भव्य आशा रथ व बँडपथकासह महिला, नागरिक व बालचमु उत्साहात सहभागी झाले होते.