पुणे

शिक्षक राष्ट्र उभारणीचे काम करतात. आमदार – चेतन (दादा) तुपे पाटील

हडपसर (वार्ताहार)

शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जीवन जगण्याची प्रेरणा व दिशा देतात. उद्याचा सुजाण नागरिक घडवण्याचे काम शिक्षक करतात. विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ बनून समाज घडविण्याचे काम करणारे शिक्षक राष्ट्र उभारणीचे काम करतात असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक सेलच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष लालासाहेब खलाटे ,कार्याध्यक्ष दिलीप मोरे,उपाध्यक्ष दिगंबर मेमाणे
व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्षम आमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या शुभहस्ते रयत शिक्षण संस्था,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,,पुणे म.न.पा.शिक्षण मंडळ, महाराष्ट्र आरोग्य मंडळ,साने गुरुजी शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक, प्राचार्य व उपस्थित प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने ,पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसनराव रत्नपारखी,सहविभागीय अधिकारी शंकरराव पवार ,पाटील एच.एस.,प्राचार्य नानासाहेब गायकवाड, प्राचार्य दत्तात्रय जाधव , गायकवाड सर,पंडीतराव शेळके,आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निलेश फुले व महिला प्रतिनिधी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.