पुणे

चंद्रकांत पाटील कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब – सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने ही ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे.

२०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी निर्विवाद विजय मिळवला होता. या निवडणुकीतील निकालाला ॲड. किशोर शिंदे यांनी माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र मा. उच्च न्यायालयाने ॲड शिंदे यांची याचिका फेटाळून लावत, माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचा विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

त्यानंतर मा. उच्च न्यायालयाच्या निकालाला ॲड. शिंदे यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत, याचिका दाखल होती. माननीय सर्वोच्च न्यायालयानेही ॲड शिंदे यांची याचिका फेटाळून लावत, मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वत्र स्वागत करण्यात आले असून, विजय सत्याचाच झाला असल्याचे मत, व्यक्त होत आहे.