पुणे

स्पोर्ट संम्बो असोशियनच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसरी राज्यस्तरीय संम्बो स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

पुणे येथे घेण्यात आलेल्या ह्या स्पर्धेचे २२,२३ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजन केले होते.या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे भारताचे संम्बो इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भगीरथ लाल व सेक्रेटरी ‘मीस सेल्फी अरोरा’ हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये १७ जिल्हे उपस्थित होते. ३२० मुलं व मुली खेळण्यासाठी आले होते. या स्पर्धेमधून विजेत्या स्पर्धकांची जम्मू कश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे चषक अहमदनगर या जिल्ह्यास मिळाले, दुसरे चषक परभणी जिल्ह्यात मिळाले,आणि तिसरे चषक पिंपरी चिंचवड या शहरास देण्यात आले.या सर्व स्पर्धकांची जम्मू कश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय संम्बो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे सेक्रेटरी श्री. कुमार शंकर उगाडे व अध्यक्ष श्री. गोंडीबा मदने यांनी उपस्थित स्पर्धकांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.