पुणेहवेली

चारित्र्याचे संशयावरुन पत्नीस जीवे मारण्याचे प्रयत्न करणाऱ्यास, लोणी काळभोर शहर पोलिसांकडून शिताफीने अटक.

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण लोणी काळभोर पोलीस ठाणे यांचे आदेशाने नवरात्रौत्सवाचे अनुषंगाने पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करण्याकरीता आदेश झाल्याने पोलीस उप-निरीक्षक अमित गोरे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई बाजीराव वीर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक पांढ-या रंगाचा शर्ट त्यावर डिझाइन असलेला शर्ट घातलेला व्यक्ती त्याचेकडे लोखंडी कोयता हातात घेऊन लोणी स्टेशन चौक येथे थांबलेला आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवले असता त्यांनी बातमीची खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले, पोलीस उप-निरीक्षक अमित गोरे यांनी सदर ठिकाणी जाऊन थोडे अलीकडे त्यांचे वाहन थांबवुन चालत जावून मिळाले बातमीप्रमाणे वर्णनाचा एक व्यक्ती संशयीतरित्या थांबलेला दिसुन आला. त्यास पोलसांची चाहुल लागल्याने तो तेथून पळुन जावु लागला असता पोलीस शिपाई राजेश दराडे यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास थोडयाच अंतरावर पकडले. पकडलेल्या व्यक्तीस त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आकाश विभीषण घुले वय २९ वर्ष धंदा मजुरी रा कामठे यांचे घरी भाड्याने शिवम हॉस्पीटलचे मागे, फुरसुंगी ता हवेज जि पुणे मुळ रा. माळी गल्ली वाशी, ता. वाशी जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले. त्यांचे अंगझडतीमध्ये कमरेच्या मागील डावे बाजुस एक धारधार धार असलेला लोखंडी कोयता मिळुन आला, त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता तो त्यांचे पत्नीस चारित्र्याचे संशयावरुन तिचा जीव घेण्याचे उद्देशाने मंचर येथे निघाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, म्हणुन हत्यारासह त्यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेविरुदध लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, पोलीस नाईक श्रीनाथ जाधव, राजेश दराडे, बाजीराव वीर, नितेश पुंदे, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.