पुणे

“लोणी काळभोर पोलिसांनी केली धडाकेबाज कामगिरी टँकर मधून इंधन चोरी करीत असताना पोलिसांचा अचानक छापा – सहा सराईत इंधन चोरांच्या आवळल्या मुसक्या”

हवेली ता. प्रतिनिधी:- अमन शेख

शनिवार दिं ८ रोजी लोणी काळभोर येथील कदम-वस्ती जवळ एका मोकळ्या जागेत टँकर मधून इंधन चोरी करीत असताना पोलिसांनी छापा मारून सहा सराईत इंधन चोरांना अटक केली, या छाप्यात पोलिसांनी दोन टँकरसह  सुमारे ऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळून आलेले आहेत, याप्रकरणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक ( गुन्हे) सुभाष काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोरे व इतर कर्मचारी यांनी धडाकेबाज कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी आदराची भावना निर्माण झालेली असुन ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या बोधवाक्यास समर्पक अशी कामगिरी असल्याने पोलिस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे, या कारवाईत धीरज काळभोर (कदम-वाकवस्ती ) अमीर शेख (कदम-वाकवस्ती) सचिन सुरवसे (लोणी काळभोर) विजय जगताप (अंबरनाथ) रामचंद्र देवकाते (लोणी काळभोर) धीरज काळभोर (कदम-वाकवस्ती) इसाक मजकुरी ( लोणी काळभोर ) यांना पोलिसांनी शिताफीने अटक केलेली आहे.
मागील काही दिवसापासून नव्हे तर काही वर्षापासून पुणे शहरातील लोणी काळभोर परीसरात पेट्रोल व डिझेल चोरीचे सत्र अखंडपणे सुरू आहे, या भागात इंधन चोरीच्या अनेक टोळ्या सक्रिय असून त्यांना अनेक बड्या व प्रस्थापित वजनदार व्यक्तींचा पाठिंबा असण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, सन २०२१ मध्ये कंपणीच्या इंधन वाहीनीलाच छिद्र पाडुन त्यास समांतर पाईपलाईन टाकून फलटण येथे इंधन चोऱ्या होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता, मागील काही दिवसांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागानेही इधन चोरांवर फार मोठ्या प्रमाणात कारवाई करून टोळक्यातील काही जणांना जेरबंद केले होते, परंतु तरीही इंधन चोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत याचाच अर्थ इंधन माफीया हे निर्ढावलेले असून त्यांना प्रस्थापिता बड्यांचा आशीर्वाद असल्याचे जन-समान्यात कुजबूत आहे, या इंधन माफियांना इंधन कंपन्यातील बड्या बड्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय चोऱ्या होऊ शकणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे, म्हणजेच कंपनीचे कार्यरत लोकसेवकच काही रकमेच्या लालसेपोटी इंधन माफीयांना मदत करीत असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे, पोलीस प्रशासनाने अशा लोकसेवकांचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे, इंधन चोऱ्यांमुळे शासनाचे आर्थिक नुकसान होऊन तेल कंपन्या आर्थिक तोट्यात जात आहेत हे केवळ कंपनीमधील कार्यरत भ्रष्ट अधिकारांमुळे होत असल्याने त्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणणे जरुरीचे आहे, अशा या इंधन चोरीमुळे पेट्रोल पंप चालकांना कमी प्रमाणात इंधन प्राप्त झाल्यामुळे तोटा सहन करावा लागतो व हा तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल टाकतानाच दर लिटर मागे कमी पेट्रोलचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अशा इंधन चोरांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का अंतर्गत कारवाई केल्यास इंधन चोरांना जरब बसेल, मोक्का कायद्यातील २१(३) कलमानुसार आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही, तसेच मोक्का खालील अटक आरोपींवर आरोप पत्र सादर करण्यासाठी पोलीसांना सहा महिन्याची मुदत वाढ मिळते, तो पर्यंत संबंधित आरोपींना जामीन मंजूर होत नसल्याने ते आरोपीना बऱ्याच वेळा वर्षभरही जामीन मंजूर होत नाही.
मागील तीन-चार वर्षांपासून इंधन माफियांवर केसेस दाखल झालेल्या आहेत, अशा इंधन माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यास यापुढे इंधन माफियांवर कायद्याचा वचक निर्माण होऊन इंधन चोरीचे प्रकार निदान टक्के तरी कमी होण्यास मदत होईल.