पुणे

पुणे: पीएमपी प्रवाशांना लुबाडणारी टोळी गजाआड साडेतीन लाखांचा ऐवज जप्त वानवडी पोलिसांची कारवाई…!

पुणे: प्रतिनिधी;( रमेश निकाळजे )

शहरात बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुबाडणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे, चोरट्यांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष शरणप्पा जाधव (वय वर्ष ३८), अमित नाना चव्हाण (वय वर्ष २७), विनोद बजरंग गायकवाड (वय वर्ष ३४), तिघे रा.मांजरी बुद्रुक) यांना अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांच्या एका साथीदाराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात चोरट्यांच्या टोळीने प्रवाशांकडील दागिने आणि रोकड लांबविली होती, या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून तपास करण्यात येत होता, पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविणारी चोरट्यांची टोळी स्वारगेट भागात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी चोरट्यांना पकडले, चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, निखील जाधव आदींनी ही कारवाई केली, पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.