पुणे

विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार तसेच फसवणूक…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

विवाहाचे आमिष दाखवून मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोथरूड येथे घडली आहे, याप्रकरणी एकास कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे.

अमोल आनंद मान (वय वर्ष २९, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अमोल आणि पिडीत तरुणीची मैत्री होती, अमोलने नवीन मोटार घेतली होती,त्याने तिला गोड बोलून व लग्नाचे आमिष दाखवून मोटारीचे हप्ते भरण्यासाठी पीडितेकडून वेळोवेळी साडेतीन लाख रुपये घेतले, त्यांतर मात्र अमोलने पिडीत तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले, आणि तिला जाळ्यात ओढून अमोलने तिच्यावर बलात्कार केला, पिडीत तरुणीने विवाहाबाबत अमोलकडे विचारणा केली असता, त्याने टाळाटाळ करून उडवा उडविची उत्तरे दिली.

दरम्यान, तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, आणी तिने याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे, या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.