पुणे

नायगाव पेठ येथे २९ तारखेला झालेल्या खुनाचे रहस्य काही तासातच उघड, लोणीकाळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

नायगांव पेठ, ता. हवेली येथील मार्ग वस्ती येथे दि. २९ रोजी खून झालेल्या सुभाष चौधरी वय ५४ वर्ष, यांच्या खूनाचे गुढ अवघ्या काही तासात उलघडण्यात लोणी काळभोर पोलीसांना यश आले आहे, दारू पिण्याच्या वादातून सुभाष चौधरी यांचा खून करणाऱ्या त्यांच्याच चुलत भावाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगांव पेठ हद्दीत मयत सुभाष चौधरी यांचा मृतदेह दिनांक २९ रोजी आढळून आला होता या संदर्भातील घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक (गून्हे) सुभाष काळे, व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले, घटनास्थळी पाहणी केली असता मयत सुभाष चौधरी यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला, पोलिसांनी खुनाचे कारण व आरोपीचा शोध चालू केला असता पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की मयत सुभाष चौधरी यांचा खून त्यांचा चुलत भाऊ संपत तुकाराम चौधरी, (वय ४६ वर्ष रा. वडाचीवाडी) याने केला आहे असे समजले आरोपी व मयत यांच्यामध्ये दारू पिण्यावरून भांडण झाले भांडण वाढले व आरोपीने कोयत्याने मयत सुभाष चौधरी यांच्या तोंडावर वार केले असता त्यांचा मृत्यू झाला, या प्रकरणी मयत सुभाष चौधरी यांचा मुलगा सौरभ चौधरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिले आहे, गुन्हा दाखल होताच आरोपी संपत चौधरी याला अटक केली आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत असल्याचे सांगण्यात आले आहे.