पुणे

“सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन केले लग्न, मात्र थोड्याच दिवसात सततच्या भांडणामुळे केला खून,पोलिसांनी केली दारुड्या नवऱ्यास अटक…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन आधी प्रेमविवाह केला आणी नंतर दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव येथे घडली आहे, मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली असून, विमानतळ पोलिसांनी चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) या नराधम पतीला तब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतनने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून ३ वर्षांपूर्वीही आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होते, तिला अमिष दाखवून पळवून नेले होते, याप्रकरणी पोलिसांनी चेतनला अटक देखील केली होती, मात्र, चेतनला नुकताच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, जेलमधून बाहेर येताच चेतनने अल्पवयीन मुलीला पुन्हा फूस लावून पळवून नेत तिच्यासोबत विवाह होता, लग्नानंतर दोघेही लोहगाव मधील निंबाळकरनगर भागात राहत होते.

चेतनला दारूचे व्यसन असल्याने काही दिवसांपासून चेतन आणि पीडित अल्पवयीन मुलीमध्ये नेहमी याच कारणास्तव भांडणे होत असत, एक दिवस वाद टोकाला जाऊन चेतनने मद्यधुंद अवस्थेत संजनाचा गळा आवळून खून केला , याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी चेतनला अटक केली आहे.

विमानतळ पोलीस पुढील तपास करत असून ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार,सहाय्यक आयुक्त आरती बनसोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पी आय एस. एन. लहाने, रत्ना सकपाळे, सचिन जाधव यांनी केली आहे.