पुणे

दीपावलीच्या निमित्ताने कोडीत येथील भूमिपुत्रांना “कोडीत भूषण” पुरस्काराने गौरवण्यात आले…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

कोडीत खुर्द (ता. पुरंदर) येथे कोडीत गावातील उच्चशिक्षित व समाजासाठी काम करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान गावाच्या वतीने ‘कोडीत भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, ज्या आई वडिलांनमुळे तुम्हाला यश व नावलौकिकता मिळाली, त्यांच्या काबाडकष्टाची जाणीव ठेवून जन्मभूमीच्या विकासामध्ये पुरस्कारार्थीनी भरीव योगदान देणे गरजेचे आहे असे मत युवा नेते बाबाराजे जाधवराव यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी प्राचार्य डॉ. सुभाष तळेकर, डीवायएसपी रघुनाथ खैरे, डॉ. मानसी पाटील, कृषी अधिकारी सोमनाथ आहेरकर, ऍडवोकेट करिष्मा जगताप- खैरे, डॉ. रूपाली कांबळे,, वेब सिरीज कलाकार दर्शन खैरे, संरक्षण दलाचे इंद्रजीत खैरे रोहन दत्तात्रय खैरे, विक्रम चंद्रकांत खैरे यांना कोडीत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्या गावामुळे आपल्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा पाया रचला गेला त्या गावाला व गावाच्या मातीला भूमिपुत्रांनी कधी विसरू नये असे सत्कारार्थी डॉ. सुभाष तळेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक गंगाराम जगदाळे, जलदूत सागर काळे, राजेंद्र काळे, उपसरपंच कस्तुरा खैरे, माजी उपसरपंच छाया खैरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोहन खैरे,सरपंच प्रसाद खैरे,
भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान कामठे, नरेंद्र मरळ, महाराष्ट्र चॅम्पियन प्रसाद कोंडे, उपाध्यक्ष मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य, ग्रामपंचायत सदस्य विशाल कांबळे,बेबी खैरे, परशुरामदादा खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक अण्णा खैरे यांनी केले सर्व मान्यवरांचे आभार सरपंच प्रसाद खैरे यांनी मानले, कार्यक्रमाचे आयोजन सरपंच, ग्रामस्थ ग्रामपंचायत कोडीत खुर्द माऊली ग्राम संघ यांनी केले होते.