पुणे

कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ लोणीकाळभोर पोलीस स्टेशन समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन…!

पुणे : प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

आज दिनांक 8 रोजी लोणीकाळभोर येथे राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांनी पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या तसेंच संसदरत्न ने सन्मानित करण्यात आलेल्या आद. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीचे शब्द वापरून अपमान केला त्याच्या निषेधार्थ आंदोलन केले.

या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा ताबडतोप राजीनामा घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी आज लोणीकाळभोर पोलिस स्टेशन समोर सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून तक्रार दाखल करून पी आय काळे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.

एका संसदरत्न असणाऱ्या तसेंच खासदार असणाऱ्या महिलेचा अतिशय खालच्या पातळीचे शब्द व भाषा वापरून विनयभंग केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांनी पोलिसांना निवेदन देताना वक्त्यव्य केले आहे.

हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणी काळभोर येथे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे,सूर्यकांत गवळी प्रदेशाध्यक्ष ग्राहक सेल,नंदू पाटील काळभोर उपाध्यक्ष पुणे जिल्हा, सोनबा बापू चौधरी प्रदेशाध्यक्ष जेष्ठ नागरिक सेल, सनी शेठ काळभोर माजी उपसभापती, सनी चौधरी तालुका अध्यक्ष विधार्थी,रोहिदास टिळेकर जिल्हा अध्यक्ष, आण्णा गणपत काळभोर,लक्ष्मण चव्हाण, सुरेखा भोरडे, स्मिता नॉर्टन,सुरेखा खोपडे, आदी मान्यवर उपस्थित होते.