पुणे

हायप्रोफाईल चोरटे बंटी – बबली जेरबंद ; अलंकार पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी तब्बल १ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

पुणे, दि.०९/११/२०२२

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या हायप्रोफाईल बंटी – बबलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल १ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.राजू दुर्योधन काळमेध (वय-४५) आणि त्याची मेव्हणी सोनिया श्रीराम पाटील (वय-३२) दोघे रा.एन.बी.पर्ल सोसायटी,क्रांतीनगर,वडगाव बु.पुणे. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपी राजु काळमेध हा हॉटेल व्यावसायिक आहे तर सोनिया ही बी.ए.एल.एल.बी (B.A. LL.B) चे शिक्षण घेत आहे. सोनिया मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला अटक केली.

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले,दरम्यान आरोपी राजू दुर्योधन याची माहिती पोलिसांना मिळाली.त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.तसेच हा गुन्हा त्याची साथीदार मेव्हणी सोनिया हिच्या मदतीने केल्याचे सांगितले.सोनिया चोरीचा मुद्देमाल घेऊन मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

सोनिया हिच्याकडून चोरीला गेलेले डायमंड (Diamond), सोन्याचे (Gold) व चांदीचे दागिने (Silver Jewellery),गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी व चारचाकी गाडी असा एकूण १ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.आरोपींचे वडगाव,वाकड, नाशिक,शिर्डी या ठिकाणी फ्लॅट आहेत तर वाकड येथे हॉटेल आहे. तसेच नाशिक येथे फार्म हाऊस आणि पोल्ट्री व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे,पोलीस उपायुक्त परीमंडळ ३ पौर्णिमा गायकवाड,
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे,पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुर्यकांत सपताळे,
अरविंद शिंदे,चव्हाण,सहायक पोलीस उपनिरिक्षक महेश निंबाळकर,पोलीस अंमलदार नलिन येरुणकर,धिरज पवार,सागर केकाण, सोमेश्वर यादव,भानुदास चांदगुडे, आशिष राठोड,हरिष गायकवाड,नितीन राऊत,तुकाराम येडे,शरद चव्हाण,शशीकांत सपताळ यांच्या पथकाने केली.