पुणे

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प उरुळी कांचन, बिट लोणीकाळभोर – येथे बाल दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प उरुळी कांचन बिट लोणीकाळभोर – १ यांच्या वतीने बाल दिनाच्या निमीत्ताने बिट लोणीकाळभोर १ च्या माध्यमातून पठारे वस्ती अंगणवाडी मध्ये ९७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉ. श्री व सौ वाघमारे ( अंकुर हॉस्पिटल,लोणीस्टेशन ) यांनी बिट मधील सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली.

डॉक्टर सौ वाघमारे यांनी शिबिराच्या वेळी उपस्थित पालकांना मुलांचा आहार आणी स्तनपान याविषयी मार्गदर्शन केले तसेंच औंध हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन कदम आणी त्यांची संपूर्ण टीम यांनी पालकांना तंबाखु , दारू, गोवा, गुटखा यांचे दुष्परिणाम याविषयीं मार्गदर्शन केले, तसेंच नेत्रदानाचे महत्व पटवून दिले, तसेंच सुकन्या योजनेची माहिती सविस्तरपणे सांगितली.

यावेळी बालदिनानिमित्त सिद्धेश्वर नामदेव काळभोर यांनी खाऊ वाटप केले,

यावेळी बिट लोणीकाळभोर १ च्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. धनश्री नायर,आणि सर्व अंगणवाडी सेविका तसेंच पालक आणी बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.