पुणे

शेवाळवाडी PMPML आगारामध्ये दोन दिवसीय नेत्रचिकिस्ता शिबिराचे आयोजन…!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

दि. 18 नोव्हे. रोजी शेवाळेवाडी आगारामध्ये PMPML राष्ट्रवादी कामगार युनियन चे अध्यक्ष मा. किरणशेठ थेऊरकर सरचिटणीस सुनिलभाऊ नलावडे, उपाध्यक्ष हरिशभाऊ ओहळ राजेंद्र कोडे यांच्या पुढाकाराने व सुरेंद्र दादा दांगट पाटील आगार व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली PMPML चे कर्मचारी व त्यांच्या कुंटुबियासाठी नेत्रचिकीत्सा शिबीर आयोजीत करण्यात आले होते, या शिबिराला कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे कोरोनामध्ये हेच पुणे महानगर परिवहन मंडळाचे कर्मचारी यांनी कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा सारखं काम केल आहे.

नेहमीच विविध कार्यामुळे राष्ट्रवादी जनरल सेलचे पदाधिकारी चर्चेत असतात ते असे छोटे मोठे कार्यक्रम डेपोमध्ये घेत असतात या प्रसंगी हे शिबिर दोन दिवस चालू राहणार आहे त्यामुळे अनेक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना याचा लाभ घेता येणार आहे या शिबिराच्या कार्यक्रमासाठी गणेश आबा ढोरे नगरसेवक, मांजरीचे मा. सरपंच शिवराज आप्पा घुले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

तसेंच आगाराचे युनियन पदाधिकारी, मा. विजय उंद्रे, अमृत बोरकर, उमेश माने, राजु मालुसरे हनुमंत काकडे, शिवाजी चंद, विशाल पवार, लक्ष्मण शेंबडे, माधव सुंकेवार उपस्थित होते, यात 210 कर्मचारी व कुटुबियांनी शिबिराचा लाभ घेतला.