पुणे

मुंबई येथे चैत्यभूमीवर पुरोगामी साहित्य व आंबेडकरी साहित्याची ५० कोटींची विक्रमी उलाढाल…!

पुणे प्रतिनिधी: ( रमेश निकाळजे )

भारतीय संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म आदी पुस्तकांना मागणी मोठ्या प्रमाणात.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर जमला होता, त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी साहित्याची करण्यात आली, चैत्यभूमीवर गेल्या चार दिवसांत ५० कोटी रुपयांचे पुरोगामी, शाह फुले, आंबेडकरी साहित्य खरेदी झाल्याचा अंदाज आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून गेल्या तीन दिवसांत लाखो अनुयायांनी चैत्यभूमीला भेट दिली, यावेळी बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकरी साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचा अंदाज साहित्य प्रसारक मंडळाचे प्रमुख राजू उके यांनी व्यक्त केला आहे, महापालिकेने चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात पुस्तक विक्रीचे स्टॉल्स उपलब्ध करून दिले होते, या वर्षी शिवाजी पार्कांत ३०० पेक्षा अधिक प्रमाणात पुस्तकांचे
स्टॉल्सवर साहित्य विक्री करण्यात आले, तर पदपथांवर साधारणतः ७०० पेक्षा अधिक पुस्तक विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती, १० रुपयांच्या पुस्तिकांपासून साडेतीन हजार रुपयांचे खंड यावेळी विक्रीस उपलब्ध होते.

भारतीय संविधान, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकांना सर्वाधिक मागणी असल्याचेही राजू उके यांनी सांगितले, यानंतर इतर आंबेडकरी साहित्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, संत कबीर यांच्यावरील पुस्तकांनाही मोठी मागणी असल्याचे पुस्तक विक्रेते आर. एस. पटेकर यांनी सांगितले.

पुस्तकांशिवाय भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आणि पुतळा खरेदी करण्याकडेही भीम अनुयायांचा कल अधिक होता, यामुळे चार दिवस प्रत्येक स्टॉलवर झुंबड उडाली होती, एका स्टॉलधारकाने तीन दिवसांत साधारणतः दोन लाख रुपयांच्या पुस्तकांची विक्री केल्याचेही सांगितले, यातून चैत्यभूमीवर चार दिवसांत साधारण ५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.