पुणे

२३ व्यां आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे एस. एम. जोशी महाविद्यालयात आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) १५ : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रॅडिशन रशिया, रयत शिक्षण संस्था आणि स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने “देश आणि विदेशातील पुरुष कर्तृत्वाचे योगदान ” या विषयावर २३ वी आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद शनिवार दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, पुणे येथे होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी दिली.या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारंभ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.खा . शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रशियाचे ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रॅडिशनचे अध्यक्ष लुदमिला शेकाचेव्हा , रशियाचे सर्गेई मेश्त्रिकोव , रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, अमर तुपे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होईल असे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी यावेळी सांगितले. या परिषदेमध्ये भव्य दिव्य पुस्तक प्रकाशनाचा सोहळा व शोध निबंधांचे वाचन होणार असल्याचे डॉ. स्नेहल तावरे म्हणाल्या.