Uncategorized

“हडपसर मेडिकल असोसिएशन आयोजित HMACON – 22 ही शैक्षणिक परिषद उत्साहात संपन्न”

हडपसर मेडिकल असोसिएशन आयोजित HMACON 22 ही शैक्षणिक परिषद दि. १७ व १८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली.
२०१७ रोजी डॉ अशोक जैन एच एम ए चे अध्यक्ष असताना आणि डॉ. सचिन आबणे परिषदेचे चेअरमन असताना पार पडलेल्या पहिल्या वहिल्या HMACON ला उदंड प्रतिसाद मिळाला होता. परंतु मधल्या काळात कोविड आणि इतर कारणांमुळे ती पुन्हा घेता आली नव्हती. परंतु २०२२ ला डॉ सचिन आबणे स्वतः एच एम ए चे अध्यक्ष झाल्यानंतर २०१७ ला त्यांनीच लावलेल्या रोपट्याला पुन्हा बहार आणण्याचं त्यांनी ठरवलं आणि HMACON 2022 च्या तयारीला सुरुवात झाली.
यावेळचे चेअरमन म्हणून धडाडीचे आणि सर्व समावेशक म्हणून ओळख असलेले कन्सल्टंट फिजीशीयन डॉ. सुशांत शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
त्यांच्या जोडीला डॉ. हिमांशु पेंडसे आणि डॉ. आनंद कांबळे यांनी को-चेअरमन म्हणून, डॉ. अमर शिंदे व डॉ. मंगेश बोराटे यांनी सचिव म्हणून तर डॉ. सतिश सोनावणे व डॉ. सुनील बांदल यांनी खजिनदार म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
या शिवाय डॉ प्रशांत चौधरी, डॉ. अजय माने, डॉ. स्वप्नील लडकत, डॉ. अपूर्व साहू, डॉ. राहुल झांजूर्णे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. चंद्रकांत हरपळे, डॉ. मंगेश लिंगायत यांची मोलाची साथ लाभली.
निवेदक म्हणून डॉ विशाल साळुंखे, डॉ.ओंकार हरिदास, डॉ. साकेत टिळेकर, डॉ. निधी जैन, डॉ. निलम बनसोडे, डॉ. अर्चना शेळके, डॉ. राज कोद्रे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संचेती हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. पराग संचेती, नोबल हाॅस्पिटल चे एम्.डी. डॉ दिलीप माने आणि वरिष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉ. नारायण कर्णे उपस्थित होते.
१७ तारखेला दुपारी १ ते ७ या वेळेत ही परिषद पार पडली आणि या वेळी इतर विविध विषयांबरोबरच Anaphylaxis या विषयावर डॉ पद्मनाभ केसकर यांचे अतिथी व्याख्यान झाले.
१७ तारखेच्या परिषदेचा शेवट पसायदान म्हणून करण्यात आला.
रविवारी १८ तारखेला सकाळी ७ ते रात्री ७ अशी संपूर्ण दिवस परिषद झाली.
१८ तारखेला दुपारी दीप प्रज्वलन आणि सरस्वती स्तवनाने परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना HMACON चेअरमन डॉ. सुशांत शिंदे यांनी तयारी दरम्यानचा अनुभव तर डॉ. दिलीप माने यांनी एच्.एम.ए. चा आजवरचा प्रवास या विषयी मनोगत व्यक्त केले आणि परिषदेला शुभेच्छा दिल्या. डॉ. पराग संचेती यांनी आपल्या मनोगतात संघटना म्हणून एच एम ए ची सर्वांगीण वृद्धी, परिषदेची उत्कृष्ट आखणी आणि रुग्णसेवा करताना आवश्यक असलेली Empathy या विषयांवर भाष्य केले आणि परिषदेच्या यशस्वी आयोजनाचे भरभरून कौतुक केले.
परिषदे दरम्यान वेगवेगळ्या सेशन्स ला पूण्यातील विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी आणि एच एम ए चे अनेक माजी अध्यक्ष हे चेअर पर्सन म्हणून लाभले.
या परिषदेचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथे ई.सी.जी. पासून रोबो पर्यंत रोजच्या प्रॅक्टिस मध्ये लागणाऱ्या सर्व विषयांवर व्याख्याने झाली.
आपल्या परंपरेनुसार सामाजिक भान ठेवत यावेळी एच एम ए ने अब-Normal home या Specially abled मूलांच्या संस्थेकडून तयार करून घेतलेल्या गिफ्ट फ्रेम सर्व प्रमुख पाहुणे आणि वक्ते यांच्या सत्कारा दरम्यान त्यांना भेट म्हणून दिल्या.
दोन्ही दिवस मिळून जवळपास ५५० डॉक्टरांनी या परिषदेचा लाभ घेतला. १८ तारखेच्या परिषदेचा समारोप सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ राहुल देशपांडे यांच्या “जाऊ देवाचीया गावा” या देव आणि अध्यात्म यांच्या पलीकडे जाऊन शास्त्र आणि इतिहासाच्या दृष्टीकोनातून देवळावर भाष्य करणाऱ्या दृकश्राव्य कार्यक्रमाने झाला.
या काॅन्फरन्स साठी नोबल हाॅस्पिटल, मनिपाल हाॅस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, विश्वराज हाॅस्पिटल, आबणे हाॅस्पिटल व साहू डेंटल क्लिनिक यांनी अर्थ सहाय्य केले. तसेच USV, MacLeod, Wockhardt, Emcure, Zyphars, LaRenon व Richcure या फार्मांनी शैक्षणिक सहाय्य दिले.
शेवटी ही काॅन्फरन्स यशस्वी होण्यासाठी एच एम ए च्या ज्या शिलेदारांनी आपला महत्त्वपूर्ण वेळ दिला त्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे यश पूर्ण होणार नाही.
यामध्ये डॉ. सत्यवान आटपाडकर, डॉ. चेतन म्हस्के, डॉ. मनोज कुलकर्णी, डॉ. अतुल होळे, डॉ. अतुल कांबळे, डॉ. अनुराधा जाधव, डॉ. दिपक शिंदे, डॉ. मालोजीराजे तनपुरे, डॉ. मनोज कुंभार, डॉ वंदना आबणे, डॉ. मनिषा सोनावणे, डॉ. शंतनु जगदाळे, डॉ. शिवांजली आटपाडकर, डॉ. राजेश खुडे व डॉ. राहुल ससाणे आणि एच एम ए चे सर्व माजी अध्यक्ष या सर्वांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
एकंदरीतच वैद्यकीय ज्ञानाची मेजवानी असलेली ही काॅन्फरन्स सर्वांच्या पसंतीस उतरली आणि यशस्वी रित्या पार पडली.