पुणेहडपसर

अल्पवयीन मैत्रिणीला देत होता त्रास, लग्न झाल्याचे बनावट व्हिडिओ केले व्हायरल, हडपसर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

हडपसर -लग्न झालेल नसतानाही लग्न झाल अस भासवण्यासाठी एका तरुणाने त्याच्याच अल्पवयीन मैत्रिणीचे लग्नाचे नकली व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना हडपसर येथे घडली. अल्पवयीन मुलीच्या लग्नाचे नकली व्हिडिओ तयार करून तिचे लग्न झाल्याचे भासविण्यासाठी ते व्हायरल करणाऱ्या दोघांवर बदनामी व विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक होळकर (22, रा. होळकरवाडी, हडपसर) आणि राज शेवाळे (रा. शेवाळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १६ वर्षांच्या मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक होळकर हा पीडित तरुणीचा मित्र आहे. तो नेहमी फिर्यादीची छेड काढून तिला त्रास देत असत. त्या वेळी फिर्यादीच्या घरच्यांनी त्याला समज दिली होती. तरीदेखील मुलीबरोबर लग्न झाल्याचे भासविण्यासाठी दोघांच्या लग्नाचे बनावट व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ इन्स्टाग्रामवर फिर्यादीस पाठवून दिले.

त्यामुळे दोघांवर बदनामी व विनयभंगप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.