पुणे

पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पालकमंत्र्याच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाटन…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे : पुणे येथे ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले, पुणे जिल्हा पालकमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले, यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, अस्थायी समिती अध्यक्ष संजयसिंग व ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त व संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

१४ जानेवारी पर्यंत या स्पर्धा पार पडणार असून कोथरुड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवानांनी भरून गेली आहे, त्याचप्रमाणे कुस्तीप्रेमींसाठी ही क्रिडांगरी सज्ज झाली आहे, भव्य ३२ एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात १२ एकरमध्ये ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत.

अतिमहत्वाच्या व्यक्ती, पैलवान, महिला, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र प्रेक्षागॅलरी उभारण्यात आल्या आहेत, २० एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेंच आरोग्य सेवा, अग्निशमन सुसज्ज ऍम्ब्युलन्स, तसेंच सुसज्ज अशी एक तज्ञ डॉकटरांची टीम, व १००० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे, तसेंच सह्याद्री हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल आणि कृष्णा डायग्नोस्टिक आरोग्य व्यवस्था पुरवणार आहेत.