पुणे

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगिरी दोन सराईत गुन्हेगार पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातून दोन वर्षा करीता तडीपार,

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर -मा. पोलीस आयुक्त, रितेश कुमार, सो यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणुन पदभार स्विकारले नंतर लागलीच त्यांनी आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरिर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालींवर नजर ठेवून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबतचा आदेश पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

सदर आदेशाचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार यांना सदर आदेशाचे अनुषंगाने चेक करून त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सूचना वजा आदेश श्री दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना दिले. त्यानुसार सव्हेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, तसेच पोलीस हवा. सातपुते व पो. ना. धनवटे यांनी पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमित बालाजी सोनवणे वय २४ वर्षे रा. माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे व गणेश बाळू भोसले वय वय २० वर्षे रा. माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, महात्मा फुले नगर लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे या दोघांनी मिळून स्वतःची टोळी बनवली असून ते चारंवार गुन्हे करीत असले बाबत माहिती मिळाली. ते दोघे भांडखोर व धोकादायक प्रवृत्तीचे गुंड असुन त्यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे येथे खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, बेकायदेशीर गर्दी जमविणे, दंगा करणे, धमकावणे, विनापरवाना घातक हत्यार, अग्नीशस्य जवळ बाळगणे, यासारखे गुन्हे दाखल असल्याने तसेच ते लोणी काळभोर गाव व परिसरात आपल्या साथीदारांसह कोयता, कु-हाड व इतर घातक शस्त्रे जवळ बाळगुन फिरत असल्याने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीत (कार्यक्षेत्रात) जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. ते आपले साथीदारांसह धुमाकूळ घालत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट, भिती च मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या गुंड व दहशती कृत्यामुळे व ते सतत आपले गुंड सदस्यांसह गुन्हे करीत असलेने त्यांचेविरुद्ध नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.

सदरची माहिती पोउपनिरी धायगुडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय चव्हाण यांना कळविल्याने त्यांनी लागलीच अमित बालाजी सोनवणे वय २४ वर्षे रा. माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे २. गणेश बाळु भोसले वय वय २० वर्षे रा. माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, महात्मा फुले नगर लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे यांचे टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करून मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त परि. ०५, पुणे शहर यांचेकडे पाठविला होता. मा. पोलीस उपायुक्त परि ५, पुणे शहर यांनी सदरचे प्रस्तावाची पडताळणी करुन दिनांक १६/०१/२०२३ रोजी त्या दोघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार २ वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे..

सदरची कारवाई मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त परि, ०५, पुणे शहर, बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुभाष काळे पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, यांनी केली आहे.